भाजपच्या पाठिंब्याने सतीश चव्हाण सुस्थितीत! भाजपच्या यंत्रणेमुळे चव्हाण तरले!

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण बॅक फुटवर गेले होते परंतु भारतीय जनता पक्षाच्या भक्कम पाठिंब्यामुळे सतीश चव्हाण सुस्थितीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी नोंदणी केली त्यांच्या जिल्हास्तर व मंडळास्तरावरील कार्यकर्त्यांनी तब्बल सहा महिने कष्ट घेऊन पदवीधरांची नोंदणी केली परंतु जागा महायुतीतील राष्ट्रवादीला सुटल्याने पेच निर्माण झाला तसेच सतीश चव्हाणकडून पंकजाताई मुंडे यांचा फोटो प्रचारात न वापरल्याने कार्यकर्त्यांचा रोषही निर्माण झाला होता परंतु पंकजाताई मुंडे यांनी बीड मधे सतीश चव्हाणच्या पाठीशी खंबीर पाठिंबा देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयासाठी कंबर कसली असून मराठवाडा स्तरावरील सर्व आमदार व कार्यकर्त्यांनी भाजपची यंत्रणा सक्रिय केल्याने बॅकफूटवर दिसत असलेले सतीश चव्हाण सुस्थितीत आल्याचे दिसतं आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सतीश चव्हाण साठी सहकार्य करण्याचे जाहीर करून त्यांची यंत्रणा सक्रिय केल्याने अडचणीत सापडलेले सतीश चव्हाण याही निवडणुकीत विजयी षटकार मारतील असे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply