आ.सोळंकेंच्या पीए महादेव सोळंकेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

माजलगाव, दि.२९: येथील भाजपा कार्यकर्ते तथा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक शेजुळ यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्या पी. ए. महादेव सोळंकेस काल अटक करण्यात आली होती. आज माजलगाव पोलीसांनी माजलगाव न्यायालयात हजर केले असता महादेव सोळंके यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली आहे.

 

माजलगाव शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे रमेश आडसकर यांचे समर्थक कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर धुळीवंदना दिवशी जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून झाला असल्याची तक्रार शेजुळ यांनी दिली होती. त्यानुसार आ.प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जनाविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.

 

याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केला असता आमदार प्रकाश सोळंके यांचे पी.ए. महादेव सोळंके यांचा सहभाग आढळल्याने त्यास मंगळवारी अटक करण्यात आली होती. आज दि.२९ बुधवारी दुपारी ३ वाजता माजलगाव न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.एन.सावंत यांनी महादेव सोळंके यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणातील तपासात आणखी कोणा कोणाची नावे समोर येतात व कोणा कोणाला अटक होते हे पाहणे जिल्हा वाशियांसाठी औत्सुक्याचा विषय झाला आहे.

Leave a Reply