गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव येथील मंदिरातील हनुमानाच्या मूर्तिवर गोमासं फेकनाऱ्या आरोपीस चकलंबा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आसिर खान बालेर खा पठाण राहणार पेडगाव याला ताब्यात घेतले आहे.पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,सपोनी सचिन इंगळे,सपोनी श्रीराम खटावकर,गोविंद राख, अर्जुन यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान हनुमानाच्या मूर्तिवर गो मासं फेकल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावून तालुक्यात तणावं निर्माण झाला होता.