आ. प्रकाश सोळंके हे भिकारचोट वैचारिक पातळीचे नेते- भाजप नेते माधव निर्मळ. माजलगावातील राजकीय तोफा पुन्हा पेटल्या

माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडून त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी त्यांचे स्वतःचे उमेदवार उभे केले त्यांना पैसा पुरवला असा आरोप केला. त्या आरोपावर टीका करताना भाजप नेते माधव निर्मळ यांनी प्रकाश सोळंके हे भिकारचोट वैचारिक पातळीचे नेते असल्याचा प्रतिहल्ला प्रकाश सोळंके यांच्यावर केला आहे.

मागील विधानसभा निवडणूक झाल्यापासून प्रकाश सोळंके पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत विरोध केल्याचा आरोप करत आहेत. मुंडे समर्थक व प्रकाश दादा समर्थक यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक झडत असून प्रकाश सोळंके यांनी केलेल्या टीकेचा आज भाजप नेते माधव निर्मळ यांनी चांगला समाचार घेतला प्रकाश सोळंके निवडणुकीपुरते महायुतीचे मते घेतात त्यांनी अनेकांना फसवले आहे. मी माझ्या हिमतीवर विधानसभा निवडणूक लढलो असून मला कुणीही पैसा दिलेला नाही. प्रकाश सोळंके यांनी मुंडे बंधू भगिनीवर केलेली टीका दुर्दैवी असून त्यांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याची टीका भाजप नेते माधव निर्मळ यांनी केली आहे.

विधानसभेत काय घडलं होतं?

माजलगाव मतदार संघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदार संघ होता.प्रकाश सोळंके दोन वेळेस भाजपकडून निवडून गेले होते त्यानंतर आर टी जिजा देशमुख हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. 2019 साली भाजपचे रमेश आडसकर नवखे असूनही त्यांनी तब्बल एक लाख मते घेतली. परंतु थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्याने मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला. भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रकाश सोळंके यांचे प्रामाणिक काम केल्याचे दिसून येते परंतु निवडणूक पूर्ण होतात प्रकाश सोळंके यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर टीकास्त्र सुरू केले. आज भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा महायुतीमध्ये एकत्र असूनही माजलगाव मतदार संघात मात्र या दोन पक्षातून विस्तवही जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply