आ.बच्चू कडूंची गोड कहाणी…

बच्चू कडूंना मंत्रीपद मिळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांना एका महिन्यात दुसरे मोठे गिफ्ट दिले आहे. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.याच महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या आचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला तब्बल 495 कोटींचा निधी दिला होता. या प्रकल्पामुळे 6 हजार 134 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. आता बच्चू कडू यांची दिव्यांगासाठीच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी मान्य करत त्यांना दुसरे गिफ्ट दिले आहे.

नुकतेच बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करुन त्याचा कार्यभार बच्चू कडू यांच्याकडे द्यावा,बच्चू कडू यांना मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांना त्या मंत्रालयाची जबाबदारी मिळन्याची शक्यता आहे.

Leave a Reply