बेरोजगारीच्या अंधारातून रोजगाराच्या प्रकाशाकडे…

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर माजलगावात साजरा झाला रोजगाराचा दीपोत्सव!

गरजवंताला भाकरी देण्या ऐवजी भाकरी कमावण्याची संधी आणि कौशल्य दिले तर तो आत्मनिर्भर होऊन सन्मानाने जगू शकतो!

सुरक्षा रक्षक व इतर सेवा भरतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य मंत्री यांचे सचिव ओमप्रकाशजी शेटे यांनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हे कौतुकास्पद कार्य हाती घेऊन माजलगाव मतदार संघातील बेरोजगार तरुणांसाठी संधीचे नवे द्वार खुले केले आहे. याबद्दल ओमप्रकाशजी शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडके आहे. कौतुक यासाठी करायचे की त्यांनी तरुणांच्या हाती धोंडा किंवा झेंडा देण्याऐवजी तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्कार्य आरंभले आहे. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, आत्मनिर्भर होऊन सन्मानाने जगावे या उदात्त हेतूने ओमप्रकाश शेटे यांच्या संकल्पनेतून देवदूत प्रतिष्ठान व रमादेवी सेवाभावी संस्थेच्या वतीने रोजगाराचा दिपोत्सव आयोजित केला होता. या संधीचा लाभ घेण्यासाठी तीन दिवस तरुणांची अक्षरशः झुंबड उडाली होती. पहिल्या दिवशी ५२००,दुसऱ्या दिवशी ८०० तर तिसऱ्या दिवशी १००० तरुणांनी नोंदणी केली.एकूण ७००० तरूणांची नोंदनी झाली. पैकी ३५०० तरुण पात्र ठरले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर टप्याटप्याने ट्रेंनिगसाठी बेंगलोर ला रवाना होतील. पहिली बॅच ८ तारखेला रवाना झाली.

प्रशिक्षणासाठी रवाना होणाऱ्या पहिल्या बॅचच्या तरुणांना निरोप देताना बंडूजी खांडेकर, शिवाजी रांजवण, दत्ता महाजन व इतर दिसत आहेत.

 

प्रशिक्षण पूर्ण होताच विमानतळ, मायक्रोसॉफ्ट,सीएनजी पार्क, फार्मा, विद्युत प्रकल्प अशा ठिकाणी रुजू करुन घेण्यात येईल. त्या-त्या राज्याच्या वेतन कायद्यानुसार या तरुणांना वेतन मिळणार आहे.बेरोजगार तरुणांसाठी आशेचा किरण ठरलेला रोजगाराचा हा यज्ञ सतत तेवत ठेवण्याचा मानस असल्याचे ओमप्रकाशजी सांगतात.यापुढील टप्प्यात माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना आणून थेट भरती मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. याद्वारे ड्रीम जॉब म्हणुन ओळख असणाऱ्या आय. टी. क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी तरूणांना उपलब्ध होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यात सर्वात जास्त ऊसतोड मजुर पुरवणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे.यात माजलगाव मतदार संघातील वडवणी,किल्ले धारूर तालुके आघाडीवर आहेत.माजलगाव तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मजुर ऊसतोडीला जातात.ही ओळख पुसली जाऊन जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ओमप्रकाश शेटे सांगतात.

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव… दीपावलीचा दिवा मनातील नैराश्य, आळस दूर करून जीवण प्रकाशमय करून टाकतो.अशा शुभ प्रसंगी बेरोजगारीचा अंधकार दूर होऊन जीवनात रोजगाराचा प्रकाश मिळत असेल तर प्रत्येकासाठी ही आनंदाची बाब होय! या आनंदासाठी कारणीभूत ठरलेले आरोग्यदूत ओमप्रकाशजी शेटे यांचे नाव काल रोजगाराच्या दीपोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणाच्या ओठी कृतज्ञता पूर्वक येत होते.ही श्रीमंती प्रत्येकालाच कमावता येत नाही.

– अशोक दोडताले, मुंबई.

Leave a Reply