संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंपाचे हादरे अजून जाणवत आहेत. काल अजित पवारच्या गटाने मेळावा घेऊन भाजप सोबत युतीची रणनीती स्पष्ट केली आहे. अजित पवार गट भाजप,शिंदे सेने सोबत आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत युती करून विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले तसेच अजित पवार सोबत आलेल्या स्टँडिंग आमदारांना पुन्हा युतीकडून संधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान 50 पेक्षा जास्त मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीची थेट लढत होत असते त्या मतदारसंघात आमदार जरी राष्ट्रवादीचा असला तरी भाजपची ताकदही चांगलीच आहे काही मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप मधील उमेदवारांना मिळालेल्या मतात 10 हजारा पेक्षाही कमी मतांचे अंतर आहे भाजपच्या या हक्काच्या जागा राष्ट्रवादीला सुटल्यास भाजपचे इच्छुक उमेदवार काय करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.