भाजपने बीड वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष बदलले.बीडला राज्य भाजपने……

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्रातील नूतन जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध केली असून बहुतांश सर्वच ठिकाणचे जिल्हाध्यक्ष बदललेले दिसत आहेत.

भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीच्या मोड मध्ये ऍक्टिव्ह झाला असून संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश स्तरावरून सर्व संघटनात्मक बदल केले जात आहेत.आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील नूतन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली यात सर्व जिल्हाध्यक्ष बदलले दिसत असले तरी बीड जिल्ह्याच्या उल्लेख यात दिसत नाही.बीड वगळता भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यात संघटनात्मक अपेक्षित बदल करून तरुणांना संधी दिल्याचे दिसत आहे.बीड जिल्ह्याच्या तथा राज्याच्या नेत्या पंकजा मुंडे या दोन महिन्याच्या राजकीय सुट्टीवर आहेत त्या सक्रिय झाल्यावर त्यांच्या अनुमतीने बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष बदलतो का कायम राहतो हे समजणार आहे.

 

Leave a Reply