ब्रेकिंग न्यूज: कार-बसच्या अपघातात ४ ठार १३ गंभीर जखमी

यवतमाळ- अमरावतीकडे जाणारी कार व यवतमाळ च्या दिशेने जाणारी बस यांच्यात जिल्ह्यातील नेर शहरालगत झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघात एव्हढा भीषण होता की कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. तर समोरून येणाऱ्या बसमधील १३ जण गंभीर जखमी झालेत.

या दुर्दैवी अपघातात  राजेश इंगोले, रजनी इंगोले (रा. यवतमाळ), वैष्णवी गावंडे (रा. वाशिम) आणि सारीखा चौधरी (रा. पुसद, यवतमाळ) असे कारमधील मृतकाचे नाव असल्याचे समजते.

Leave a Reply