लव्ह जिहाद विरुद्ध भगवं वादळ रस्त्यावर!

माजलगाव येथे सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा

माजलगाव, दी.४ (प्रतिनिधी): लव्ह जिहाद व बळजबरी धर्मांतराच्या विरोधात कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज माजलगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने अतिशय भव्य विराट मूक मोर्चा काढण्यात आला.

आज माजलगाव शहरात लव्ह जिहाद व धर्मांतराच्या विरोधात विराट मूक मोर्चा काढण्यात आला शहरातील झेंडा चौक भागातून शिवाचार्य चंद्रशेखर महाराज यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून मोर्चाची सुरवात झाली.सदरील मोर्चात महिलांची,महाविद्यालयीन मुलींची संख्या लक्षणीय होती. या मोर्चाचे झेंडा चौक येथून प्रस्थान झाले. मोर्चाची सुरुवात ध्येय मंत्राने करण्यात आली व मोर्चा चा शेवट प्रेरणा मंत्राने घेण्यात आला. बीड जिल्ह्यात यावेळी सर्वात प्रथम माजलगाव मध्ये हा हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा निघाला आहे. याआधीही CAA- NRC समर्थन तिरंगा रॅली बीड जिल्ह्यात फक्त धारूर नंतर माजलगाव शहरातच निघाली होती.

या मोर्चात हजारोच्या संख्येने सर्व हिंदू समाज महिला माता भगिनी सर्व हिंदू संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज चौकात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.माजलगाव धरणाजवळील शासकीय जागेत अनधिकृत मजार दर्गा चे बांधकाम तात्काळ हटवावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. सदरील मोर्चात तालुक्यातील डॉक्टर, वकील. व्यापारी,शिक्षक, प्राध्यापका सह हजारो विध्यार्थी सामील झाले होते. या प्रसंगी सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चाने निश्चितच जे जिहादी त्यांना आळा बसेल व आपल्या शाळेतील व महाविद्यालयीन मुलींना संरक्षण मिळेल असा विश्वास मोर्चेकरांनी व्यक्त केला.

Leave a Reply