वडवणी/प्रतिनिधी: वडवणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचा काल निकाल लागला आणी पंचवीस गावचा कारभारी निवडला यात अनेकांना धक्के बसले, तर काही जणांचा अल्पशा मताने पराभव झाला तर काही जणांचा पॅनल निवडुन आला परंतु सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला यामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था पहायला मिळाली. वडवणी तालुक्यातील चिंचवण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चिंचवण येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ बडे, माजी सरपंच महिपतराव कोठुळे, माजी सरपंच शेख अब्बास भाई, माजी सरपंच राम मात्रे, माजी सरपंच बिभिषण पोटे, माजी सरपंच गोपीनाथ मात्रे, माजी चेअरमन आसाराम बडे, चेअरमन शेख समशेर भाई, माजी उपसरपंच शेख आबेद भाई, हे प्रस्थापित व्यक्ती एकत्रीत येऊन पॅनल केला आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची केली राष्ट्रवादी काँग्रेसला तर स्वातंत्र पॅनल करता आला नसल्याने त्यांच्यावर नामुष्की आली तर भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ बड़े यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन पॅनल करावा लागला या सर्वांच्या विरोधात चळवळतील आणि सेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी स्वतः हा पॅनल केला व या सर्वांना मिळुन फक्त सदस्य निवडुन आणता आले परंतु सरपंच पदाच्या उमेदवार निवडुन आणता आला नाही चिंचवणच्या सर्व मातब्बरा विरुद्ध एकटा दत्ता वाकसे लढला अन् सरपंच पदाचे उमेदवार शितल सुग्रीव नेटके या निवडुन आणण्यात यश मिळाले असुन राजा आला पण सेना गेली असली तरी डोंगरपट्यात दत्ता वाकसे किंगमेकर ठरले असुन यांची जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी व भाजप एकत्रित लढुन सरपंच पदाचा महत्त्वाचाच उमेदवार निवडून आणता आला नाही म्हणून एवढे एकत्रितपणे लढुन या सर्वांना दत्ता वाकसे सरश ठरले असल्याने दत्ता वाकसे यांचा गड गेला पण सिंह आला तर सोमनाथ बडे यांचा गड आला पण सिंह गेलअशी अवस्था झाली आहे. चिंचवणच्या सर्व प्रस्थापिता विरुद्ध एकटे लढुन दत्ता वाकसे किंगमेकर ठरले असुन सरपंचपदी शितल नेटके विजयी झाल्याने डोंगरपट्यात या चिंचवण ग्रामपंचायतीची जोरदार चर्चा आहे.