एमपीएससी टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण आरोपी गजाआड या कारणामुळे केली हत्या

एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेहावरून व पोस्टमार्टनच्या रिपोर्ट वरून सदरील प्रकरणात हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता

पुण्यात एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार स्वीकारून दर्शना पवार राजगड किल्ला पाहण्यासाठी तिचा मित्र व नातेवाईक राहुल हंडोरे सोबत गेली होती. अनेकांनी दोघांना राजगड किल्ला चढताना पाहिले होते परंतु किल्ला उतरताना एकटा राहुल हंडोरेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

काही दिवसानंतर दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली दरम्यान ज्याच्या सोबत दर्शना गड पाहण्यास गेली होती तो राहुल हंडोरे हत्या झाल्याच्या दिवसापासून फरार असल्याकारणाने पोलिसांचा राहुल वर संशय आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अंधेरी रेल्वे स्थानकात आरोपी राहुल हंडोरे याला अटक केली या प्रकरणात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारवर आरोपी राहुल हंडोरे हा एकतर्फी प्रेम करत असे. लहानपणापासून दर्शना व राहुल एकमेकांना ओळखत होते राहुल हंडोरे एका खाजगी कंपनीत फूड डिलिव्हरी व्हायचं काम करत असे तसेच तो दर्शना सोबत राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत होता.

दर्शना उत्तीर्ण झाली परंतु राहुल परीक्षेत अपयशी ठरला तसेच त्याने दर्शना पवारला लग्नाची मागणी घातली होती परंतु दर्शनाच्या कुटुंबीयांनी दर्शनाचा विवाह इतरत्र ठरवल्यामुळे आरोपी राहुल हंडोरे व्यथित होऊन दर्शना पवारचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असून राहुल हंडोरे याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. पोलीस पुढचा तपास करीत आहेत.

Leave a Reply