भुसावळ, दि.१३(प्रतिनिधी): स्वातंत्र्यानंतर देश एकसंध ठेवण्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन श्री शिवशंभू विचारदर्शनचे सदस्य शिवव्याख्याते सच्चिदानंद उर्फ माऊली आहेर यांनी केले.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक जयंती उत्सव समिती विद्युत कारखाना भुसावळ येथे आयोजित जयंती समारोह प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून श्री आहेर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, “देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या अखंडतेचे महत्त्व ओळखून सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत कणखर पावले उचलत अनेक संस्थांने विसर्जित केली.यासाठी प्रसंगी बळाचा वापर केला.सरदार गांधीजींप्रति समर्पित असले तरी त्यांनी राष्ट्रनिर्मानाच्या कार्यासाठी वेळ प्रसंगी गांधीजिंच्या विचारधारेच्या विरुद्ध जाऊन सुद्धा अनेक निर्णय घेतलेले आहेत.”
महात्मा गांधी यांच्या दुर्दैवी हत्ये नंतर सरदारांनी अगदी स्पष्ट पवित्रा घेऊन म्हटलं होतं की, गांधी हत्येच्या आरोपींचा भले आरएसएसशी किंवा हिंदुमहासभेशी संबंध असेल, परंतु संघटना म्हणून यापैकी एकही त्यांच्या कटात सामील नव्हती. गांधी हत्येला आरोपी व्यक्तिशः जबाबदार होते. त्यांची स्वतःची वैयक्तिक विचारसरणी काहीही असली, तरी या दोन संघटनांचा अशा तऱ्हेनं कटाशी संबंध जोडता येणार नाही.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्युत कारखान्याचे प्रबंधक राजेश कुलहरी तर प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री व्ही के समाधिया, आर आर निकम, सुधीर जंजाळे,उपेंद्र कुमार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कोलते, ईश्वर खंडारे, अरविंद थोरात, दीपक खराटे, हरिश्चंद्र सरोदे, मुकेश महाजन, चेतन सनसे, विकास अंभोरे, तनुजा धांडे, अमोल वाघमारे, भरत शर्मा, राजेश सोनी, प्रशांत कमलेजा, योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.