मी नाराज नाही-पंकजा मुंडे

गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसात दोन वेळा बीड जिल्हा दौरा केला या दोन्ही दौऱ्या वेळी मुंडे भगिनी अनुपस्थित होत्या संभाजीनगर येथील जे पी नड्डा यांच्या जाहीर सभेच्या कार्यक्रमाप्रसंगी पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नावही नव्हते या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्हा दौऱ्यातून जाणीवपूर्वक माघार घेतल्याची चर्चा माध्यमातून रंगवण्यात आली तसेच पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याच्या बातम्याही विविध माध्यमांनी दाखवल्या परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिक्षक आमदार निवडणुकीच्या अनुषंगाने अंबाजोगाईत येत आहेत यावेळी या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार असून मी माझ्या पक्षावर अजिबात नाराज नसल्याचे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी केले.

Leave a Reply