भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड डॉ.प्रशांत पाटील

मुंबई: सिद्धिविनायक अर्बन चे चेअरमन, भाजपा नेते डॉ. प्रशांत पाटील यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडून ही निवड घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री मा.विजयराव चौधरी यांच्या हस्ते डॉ प्रशांत पाटील यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच उद्या पुणे येथे होत असलेल्या महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण देखील देण्यात आले आहे.

डॉ.पाटील यांनी पूर्वी महाराष्ट्र भाजप सहकार आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील दायित्व निभावलेले आहे त्यांनी या संधीचे सोने करत अतिशय चांगले काम केल्यामुळे डॉ. पाटील यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली. डॉ. पाटील हे अनेक वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य करत आहेत, त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटीच्या माध्यमातूनही ते सामाजिक कार्य करतात . सहकार क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र असो अथवा धार्मिक क्षेत्र असो अशा वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून डॉ पाटील हे अनेक वर्षापासून अशा प्रत्येक ठिकाणी ते कार्य करताना दिसतात. तसेच पक्षाने दिलेली कुठलेही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतात. माजलगाव येथे चालू केलेली माणुसकीची भिंत असो कोरोनाच्या महासंकटमय काळात असंख्य गरजू गरीब व्यक्तींना किराणा किट असो, आर्थिक मदत असो, औषधी वाटप असो रोटरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळेतील गरजवंत व गरीब विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासारखे असंख्य समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन प्रथम राष्ट्र मानत ,जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सामाजिक क्षेत्रात काम करतात.

 

या सर्व कार्याची दखल घेत त्यांची प्रदेश कार्यकारणीवर निवड झाली आहे. डॉ पाटील यांच्या निवडीबद्दल केंद्रीय भाजपा सचिव पंकजा मुंडे खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, विधानपरिषद गटनेते आ.प्रवीन दरेकर मा .आमदार राधाकृष्ण होके पाटील, मा.आ. आर टी देशमुख, भाजपा नेते रमेशराव आडसकर, भाजपा नेते मोहनराव जगताप, डॉ.प्रकाशराव आनंदगावकर ओमप्रकाश शेटे अरुण राऊत बबन सोळंके डॉ अशोक तिडके विश्वजित देशपांडे ,डॉ. भगवान सरवदे ,ज्ञानेश्वर मेंडके , नितीन नाईकनवरे , गोविंद बजाज, लक्ष्मीनारायण मुंदडा शशीकिरण गडंम डॉ. स्वानंद कुलकर्णी अँड सुरेश दळवें प्रशांत भानप , विनायक रत्नपारखी दत्ता महाजन आनंत जोशी उमेश मोगरेकर सुधाकर देशमुख सुधीर नागापुरे कमलेश जाबरस प्रदीप कुलकर्णी तुकाराम येवले उमेश जेथलीया गोरख मेंडके अशोकराव सोळंके कमलाकर कुरे ऍड विश्वास जोशी बळीराम आजबे पवन मोगरेकर गणेशराव पाचणकर आनंद कुलकर्णी सतीश जोशी दत्ता काळे, बी एन कुलकर्णी, कैलास जोशी यासह राजकीय सहकार, रोटरी, समाजिक, धार्मिक औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महा जागरण maha Jagran mahajagran

Leave a Reply