वाढदिवसाला शक्तीप्रदर्शन; मोहन जगताप भाजपचे उमेदवार? डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणाले, “…..तर मी मोहन जगतापांच्या…….!”

माजलगाव दी.१० (प्रतिनिधी):

माजलगाव मतदारसंघातील भाजपचे नेते मोहन जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून विधानसभेवर भाजप उमेदवार म्हणून दावा ठोकला आहे. या वाढदिवसाला मतदारसंघातील अनेक जैष्ठ मंडळी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी मोहन जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास पक्ष हितासाठी स्वत:च्या महत्त्वाकांक्षेला मुरुड घालून त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सूचित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती कारखान्याचे सर्वेसर्वा तथा भाजप नेते मोहन जगताप यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधत जगतापांनी शक्ती प्रदर्शन करून एक प्रकारे भाजपच्या हायकमांडला स्वतःची ताकद दाखवून दिली आहे.2019 सालीही मोहन जगताप विधानसभेला उत्सुक होते परंतु ऐन वेळी माजलगाव रमेश आडसकरांना भाजपने उमेदवारी दिली. दरम्यान आता पुला खालून बरेच पाणी वाहून गेल्याने दिवसेंदिवस मोहन जगतापांची दावेदारी भक्कम होताना दिसत आहे तसेच विधानसभेला जरी अवकाश असला तरी आतापासूनच रमेश आडसकर व मोहन जगताप यांनी उमेदवारी साठी दंड थोपटले आहेत प्रत्येक कार्यक्रमात पुढची उमेदवारी मलाच मिळणार असल्याचा दावा दोघेही करताना दिसत आहेत.

नेमकं काय म्हणाले डॉ.ओमप्रकाश शेटे….

रुग्ण सेवेतून लोकप्रिय झालेले ओमप्रकाश शेटे हे स्वतः माजलगाव मतदारसंघातुन 2019 साली इच्छुक होते नंतरच्या काळात त्यांनी बेरोजगारांसाठी मेळावे घेऊन अनेकांना नोकऱ्याही मिळवून दिल्या माजलगावातील भाजप कार्यकर्त्यां मध्ये शेटेंची चांगली ट्युनिंगही जुळली आहे अनेक भाजप कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेलाही ओमप्रकाश शेटेंना भाजपची उमेदवारी मिळावी असे वाटते. परंतु कालच्या कार्यक्रमात बोलताना डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीने मोहन जगताप यांना उमेदवारी दिली तर मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे सुतोवाच केले.” डॉ. शेटे हे स्वतः विधानसभेचे दावेदार आहेत, परंतु भाजपाने कोणताही उमेदवार दिला तरी आपण त्यांचा मनापासून करू असे सांगून त्यांनी आपली भाजप प्रती असलेली निष्ठा अधोरेखित केली आहे. आपल्या इच्छा – आकांक्षांना मुरड घालून, मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे..! असा ‘हट्ट’ न करता पक्ष व पक्षश्रेष्टी यांच्या आदेशाला प्रथम प्राधान्य देणारे ओमप्रकाश शेटे म्हणूनच भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

आता रमेश आडसकरांच्या भूमिकेकडे लक्ष:

मोहन जगतापांनी जाहीर कार्यक्रमात भाजपकडून निवडणुक लढवणार असल्याचे घोषित केले तसेच माजी आ.केशव आंधळे, डॉ प्रकाश आनंदगावकर, ओमप्रकाश शेटे, नितीन नाईकनवरे यांच्यासह मतदारसंघातील महत्वाचे नेते मोहन जगतापांच्या ताफ्यात दिसत असल्याने साहजिक त्यांची बाजू दिवसेंदिवस भक्कम होताना दिसत आहे. आता रमेश आडसकर कशा प्रकारे व्युह रचना आखून स्वतःच नेटवर्क वाढवतात यावर पुढचे गणित अवलंबून असून सध्यातरी मोहन जगतापांच्या शक्ती प्रदर्शनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Leave a Reply