दिव्यांगाचे जीवन कष्टमुक्त करण्यासाठी कायम कटीबद्ध राहील- खा.डॉ. प्रीतम मुंडे

माजलगाव: समाजातील गरीब वंचित लोकांची सेवा करण्याची भाग्य लाभले. बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवीला जात आहे. माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हे तपासणी शिबिर आयोजित केले होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा. डॉ प्रीतम मुंडे व अध्यक्ष रमेशराव आडसकर होते.

 

यावेळी प्रीतम ताई मुंडे यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधला. समाजातील गरीब वंचित गरजू लोकांची सेवा करण्याचा वारसा शिकवण मुंडे साहेबांनी दिली आहे. मुंडे साहेब नेहमी म्हणत तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन सेवा केली पाहिजे, त्यामुळे तळागाळातील दिव्यांग बांधवांचे जीवन कष्ट मुक्त करण्यासाठी ही योजना आपल्या जिल्ह्यात कार्यरत करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांमुळे मिळत आहे यासाठी त्यांची देखील आभार मानले. दिव्यांगांना येणाऱ्या विविध अडचणी यापुढे मी येऊ देणार नाही यासाठी मी कटिबद्ध राहील. या मोफत शिबिराच्या माध्यमातून गरीब गरजू दिव्यांगाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले . ही योजना तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचणे ही माझी जबाबदारी आहे व ते मी प्रामाणिकपणे पार पाडेल. काही व्यक्ती केवळ राजकारणासाठी, येणाऱ्या निवडणुकीसाठी असे शिबिर घेतात व फक्त भुलथापा मारून आश्वासने देतात पण या शिबिराचा फायदा हा नक्कीच सर्वसामान्य गरजू गरीब दिव्यांगांना झाला पाहिजे हा उद्देश घेऊन आम्ही तळागारापर्यंत जाऊन दिव्यांगांना या शिबिराचा फायदा होईल यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न राहील. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आडसकर म्हणाले पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे या दोन्ही बहिणी मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा चालवत आहेत याचा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दिव्यांगांना लागणारे व्हीलचेअर सह लागणारे इतर सर्व साहित्य वाटप करू साहित्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मोहन जगताप याप्रसंगी बोलताना म्हणाले मागील काळात दिव्यांगांना अनेक अडचणी आल्या या पुढील काळात कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी वैद्यकीय अधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे या पुढील काळात दिव्यांगावर कुठलाही अन्याय होऊनये याची काळजी घेण्यासाठी आम्हीही प्रयत्न करूू.

जाहिरात

कोणत्याही दिव्यांगास काहीही अडचण आली तर यापुढे मला सांगावे . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सचिव बबन सोळंके यांनी केले , यावेळी बबन सोळंके म्हणाले मागील काळात दिव्यांगांना कुठल्या कुठल्या अडचणी आल्या , कोणामुळे आल्या पुढील काळात अडचणी येऊ नये म्हणून काय केले पाहिजे असे सविस्तर या ठिकाणी माहिती सांगितली . या शिबिरासाठी तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी विशेष मेहनत घेतली व हे शिबिर त्यामुळे चांगले झाले याबद्दल प्रीतम मुंडे व रमेश आडसकर यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष अरुण राऊत नितीन नाईकनवरे प्रशांत पाटील , भगवान सर्वदे नीलकंठ भोसले अशोक तिडके तुकाराम येवले अभय होके रूपाली कचरे दीपक मुंडे हनुमान कदम ईश्वर खुरपे दीपक मेंडके शरद यादव विनायक रत्नपारखी नानाभाऊ शिंदे किशोर होके अविनाश गोंडे वसंत अल्कुंटे विठ्ठल जाधव दत्ता आढाव गोपाळ पैंजणे खय्युम पठाण दत्ता महाजन अर्जुन पायघन, दत्ता क्षीरसागर ,पोलीस उपनिरीक्षक बल्लाळ साहेब , उपविभागीय अधिकारी बाफना मॅडम तहसीलदार मनाळे मॅडम , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कट्टे , डॉ. घुबडे , सतीश राठोड सत्यनारायण उनउने सर्जेराव पोटभरे व ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वृंद भाजपा नेते पदाधिकारी शक्ती प्रमुख बुथ प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक रत्नपारखी यांनी मांनले.

Leave a Reply