मंत्री बँकेला गतवैभव मिळवून देण्याचे नूतन पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान 

बीड (गंगाधर गडदे): शहरातील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. आज शुक्रवारी मंत्री बँकेचे नूतन पदाधिकारी निवडले जाणार आहेत सुभाष सारडा यांनी ज्या बँकेचा पाया मजबूत केला होता त्या बँकेला प्रशासकांच्या काळातील गैर व्यवस्थापनाचे हादरे बसले मात्र पाया भक्कम असल्याने बँकेचा डोलारा टिकला, आता या बँकेला पुन्हा गत वैभव मिळवून देण्याचे आवाहन तरुण पदाधिकाऱ्यांना पेलावे लागणार आहे. आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होत असून डॉ आदित्य सारडा यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या सहकार आणि व्यापारात ज्या संस्थांनी भरीव योगदान दिले त्यात मंत्री बँकेचा सिंहाचा वाटा आहे सुभाष सारडा यांनी या बँकेचा पाया भक्कम करत बँकेची प्रगती केली या बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले अर्थात बीड जिल्ह्यात नेहमीच चालणाऱ्या राजकारणाचा मधल्या काळात या बँकेलाही फटका बसला आणि दोन वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासन नेमला. प्रशासक आल्यानंतरही कित्येक महिने बँकेचे ठेवीदार बँकेचे ग्राहक , बँकेचे सभासद यांनी बँकेवर विश्वास ठेवला बँकेवर प्रशासक आल्यानंतर बँकेच्या जुन्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले त्यामुळे बँकेच्या ठेवीदार सभासदांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला त्यामुळे बँकेच्या काही ठेवी गेल्या पण सारडा कुटुंबाने सभासदांना विश्वास दिला आणि बँकेचे डिपॉझिट पुन्हा वाढले संचालकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बँक कोसळते की काय असा संभ्रम ठेवीदारांमध्ये झाला बँकेतून अनेकांनी ठेवी काढल्या त्यातच प्रशासकांच्या काळात आकस भावनेतून झालेल्या बदल्या यामुळे काही कर्मचारी रजेवर गेले तर काहींनी नोकरी सोडली उलट पक्षी जे जे खाते रेगुलर होते ते खाते इतर त्रासापोटी दुसऱ्या बँकेत गेले परिणामी बँकेचा एन, पीए वाढला व बँकेच्या येणाऱ्या उत्पन्नामध्ये घट झाली व त्यामुळे आरबीआय च्या रेशो मध्ये प्रशासक आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बँकेच्या दृष्टीने घातक बदल झाले या सर्व परिस्थितीत बँकेची निवडणूक बिनविरोध झाली सारडा कुटुंबाला विरोध करू पाहणाऱ्यांना उमेदवार देखील देता आला नाही. सभासदांनी आपण सुभाष सारडा यांच्याच सोबत आहोत हे दाखवून दिले आणि आता मंत्री बँकेत आज तरुणांची टीम पदाधिकारी निवडणार आहे ज्या बँकेचा पाया सुभाष सारडा यांनी भक्कम केला त्या बँकेत मधल्या काळात सहन कराव्या लागलेल्या आघातामुळे आणि त्याच्या चुकवाव्या लागलेल्या किमतीमुळे आता नवीन पदाधिकाऱ्यांना अधिक झोकुन द्यावे लागणार आहे बँक निर्बंध मुक्त करण्यासाठी बँकेची तरलता वाढविणे कर्ज वसुली ठेवी मिळविणे आणि सारे निकष पूर्ण करून बँकेला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांना पेलावे लागणार आहे.

 

डॉ आदित्य सारडा अध्यक्ष होण्याची शक्यता

डॉ आदित्य सारडा यांचा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून अनुभव पाहता यांनी जिल्हा बँकेचे ठेवीदार बँकेचे ग्राहक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन कर्ज देणे सदरील कर्ज किसान क्रेडिट कार्ड मार्फत वाटप करणे देशात सर्वात जास्त पिक विमा बीड जिल्हा बँकेने डॉ आदित्य सारडा यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भरून घेतला त्यामुळे मा पंतप्रधान यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले यावरून डॉ आदित्य सारडा यांची वर्णी लागली तर निश्चित सहकारी बँकेची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.

सुभाष सारडा यांचा आदर्श घेण्याची गरज

राजकारण समाजकारण आणि विशेष सहकार यामध्ये सुभाष सारडा यांचा आदर्श घेण्याची नक्कीच गरज आहे त्यांनी मंत्री बँक उभा केली त्या माध्यमातून अनेक उद्योजक निर्माण झाले जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा बँक कलम 11 मधून बाहेर काढली आणि आपल्या काळात कोणत्याच पक्षाचा शिका लागू दिला नाही बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षासोबत त्यांचे जवळचे संबंध होते आणि ठेवले पण आता ते या कोणत्याच पडला चिटकून न बसता पुढच्या पिढीला त्यांनी संधी दिली मग जिल्हा बँक असो की मंत्री बँक.

Leave a Reply