उद्या पासून मोटारसायकलच्या किंमती…

मुंबई (प्रतिनिधी): दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी.हिरो मोटोकॉर्पने १ डिसेंबरपासून आपल्या वाहनांची (एक्स शोरूम) किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे दुचाकी खरेदी इच्छुकांच्या खिशावर थोडा अधिक भार पडणार आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,१ डिसेंबर २०२२ रोजी पासून हिरोच्या वाहनांची किंमती १५०० रुपयांनी वाढणार आहेत. विशिष्ट मॉडेल्स आणि बाजारपेठेनुसार वाढीचे अचूक प्रमाण बदलेल, असे कंपनीने म्हटले आहे.वाढत्या महागाईमुळे कंपनीच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे, असे हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वित्तीय अधिकारी निरंजन गुप्ता यांनी म्हटले. तसेच, ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कंपनी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा उपाय देत राहील, असेही गुप्त यांनी म्हटले आहे.

Leave a Reply