सात दिवसात CAA लागू होणार- केंद्रीय मंत्री ठाकूर

 

वृत्तसंस्था

गेल्या तीन वर्षापासून थंड बस्त्यात पडलेला CAA कायदा येत्या सात दिवसात पूर्ण देशभर लागू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री शंतनु ठाकूर यांनी एका कार्यक्रम प्रसंगी सांगितले आहे.

मागील तीन वर्षापासून नागरिकता अधिनियम कायदा लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्न 2020 साली संसदेत कायदा करून CAA लागू करण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला होता. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग मधे मोठे आंदोलनही झाले होते दिल्लीच्या धर्तीवर संपूर्ण देशभर शाहीन बाग आंदोलन छेडण्यात आले होते. सलग तीन महिने आंदोलन सुरू राहूनही मोदी सरकार मागे हटले नव्हते. कोरोनाच्या लाटेत आंदोलन स्थगित करण्यात आले होते आता CAA कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले असून येत्या सात दिवसात संपूर्ण देशभर CAA कायदा लागू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री शंतनु ठाकूर यांनी एका पब्लिक रॅली मधे सांगितले आहे.

Leave a Reply