माजलगाव सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ओळखल्या जावं- मोहन जगताप

 

माजलगाव प्रतिनिधी

माजलगाव शहराची ओळख सांस्कृतीक दृष्ट्या पुढारलेल शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी इथल्या विद्यार्थ्यां मधील सुप्त गुणांना वाव मिळायला हवा याकरिता त्यांना योग्य व्यासपीठ व संधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते मोहन जगताप यांनी नमो चषक बक्षीस वितरण प्रसांगी केले.

 

आज भाजप मध्यवर्ती कार्यालयात नमो चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्यांना मोहन जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश टवानी होते तसेच भाजप प्रदेश सदस्य प्रशांत पाटील, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष गौरीताई देशमुख, पांडुरंग तात्या सोळंके, भगवानराव आगे, संतोष अबा यादव, उद्धवराव नागरगोजे, भाजप विस्तारक रमेश शेंडगे,सुरेश काका एरंडे, बबन अण्णा शिरसाट, नानासाहेब घोडके, वसंत अण्णा आलकुंटे,भाजप जैष्ठ नेत्या छाया ताई कोकीळ, गंगामसला सरपंच भालचंद्र सोळंके, अविनाश गोंडे, नगरसेवक विनायक मामा रत्नपारखी, सोशल मीडिया प्रदेश सदस्य दत्ता महाजन, पवन मोगरेकर, भाजप युवा नेते मुश्ताक मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमूख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . पुढे बोलताना मोहन जगताप यांनी सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धांची तरुण मुलांना किती गरज आहे यावर पालकांनी लक्ष देऊन आपल्या पाल्यामधील सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी त्याला अश्या स्पर्धा मधे सहभागी होऊ द्यावं. माजलगाव शहराची ओळख सांस्कृतीक दृष्ट्या पुढारलेले शहर व्हावी अशीही इच्छा असल्याचं त्यांनी मनोगतात सांगितलं.या प्रासंगी प्रभाकर खेत्री, माजी सरपंच प्रल्हादराव दळवी, अंकुशराव भोसले, बिबिषणराव बडे, राजेश जाधव, चांद भाई, शेख अब्बास, महादेव आगे, सगीर भाई देशमुख, ताज खान पठाण, सुभाषराव कांबळे, रवींद्र शिंदे, अमोल राऊत, नामदेव मुळे, रवी गायकवाड यांच्यासह शहरातील क्रीडा प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply