गैर हिंदूना मंदिर प्रवेशास बंदी. मद्रास उच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला आदेश

मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या एका निर्णयात गैर हिंदू लोकांना मंदिरात प्रवेश बंदी केली असून मंदिराच्या बाहेर गैरहिंदुंनी मंदिरात प्रवेश करू नये अशा पाट्या लावण्यात याव्यात असा तामिळनाडू सरकारला न्यायालयाने आदेश दिला आहे. मंदिर हे काही फिरण्यासाठी पिकनिक स्पॉट नाही. जो कुणीही मंदिरात येईल त्याची हिंदू धर्मावर आस्था असावी हिंदूंना त्यांच्या धर्माचा पालन करण्याचा मौलिक अधिकार आहे.

मदुराई येथील सिंतली कुमार यांनी याचिकेद्वारे मागणी केली होती की मंदिरांमध्ये केवळ हिंदूंनाच जाण्यास परवानगी देण्यात यावी मंदिराच्या गेटच्या बाहेर केवळ हिंदूंनाच मंदिरात प्रवेश असल्याच्या पाट्या व डिस्प्ले बोर्ड लावावा अशीही त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या सर्व याचिका मद्रास उच्च न्यायालयाने मान्य केल्या असून गैरहिंदूंना तामिळनाडू मधील मंदिरात प्रवेश बंदी केली असून सरकारने तात्काळ मंदिराच्या बाहेर गैरहिंदूंनी मंदिरात प्रवेश करू नयेत अशा पाट्या व डिस्प्ले बोर्ड लावण्यात यावे असा तामिळनाडू सरकारला आदेश दिला आहे

Leave a Reply