भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने वारंवार डावलले 2019 च्या पराभवा पासून पंकजा मुंडे भाजपच्या वर्तुळातून लांब जात असल्याचेही दिसले. मागील आठवड्यात मराठवाड्यात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा. यांची जाहीर सभा झाली या सभेच्या निमंत्रण पत्रिकेवरही पंकजा मुंडे राष्ट्रीय सचिव असूनही त्यांचा नामोल्लेख नव्हता तरीही पंकजा मुंडे मोठं मन दाखवून सभेस उपस्थित राहिल्या.या सभेदरम्यान शिरीष बोराळकरांनी ताईंना उद्देशून “दोनच मिनिटात भाषण आवरा” हे सूचित करणंही भाजप कार्यकर्त्यांना रुचलेलं नाही.
पंकजा मुंडे यांच राजकीय कार्यक्षेत्र बीड जिल्हा असला तरी संपूर्ण मराठवाड्याच्या त्या नेतृत्व करतात. असं असताना त्यांना भाजप नेते बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित का करीत आहेत?पंकजा मुंडेही शांत राहून हा अन्याय का सहन करत आहेेेत असे शेकडो प्रश्न बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्याना पडले आहेत. मागील महिन्यातच बीड येथे एका बैठकीत याच मुद्यावर भाजप संघटनमंत्री प्रकाश कौडगे यांना भाजप कार्यकर्त्यांच्या रागाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान काल एका मुलाखती मधे जेव्हा पंकजा मुंडे यांना संधी का मिळत नाही असे विचारण्यात आले तेंव्हा पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाचे उत्तर संधी न देणारेच देऊ शकतात असे सांगून पक्षाच्या कोर्टातच चेंडू टोलावला.
आज मराठवाडा नेतृत्वहीन दिसत असताना पंकजा मुंडे सारख्या सर्वसमावेशक नेतृत्वाला भाजप संधी का देत नाही असा प्रश्न मराठवाड्यासहीत महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.