मराठा व मराठा-कुणबीसाठी मोफत संगणक डिप्लोमा

सारथी आणि एमकेसीएलचा रोजगार निर्मितीसाठी अभिनव उपक्रम.!  महिला, युवक-युवती, बेरोजगारांना मोफत प्रशिक्षण आणि रोजगार

सारथी पुणे व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या शासकीय योजनेअंतर्गत, मराठा व कुणबी १८ ते ४५ वय वयोगटातील किमान १० वी पास उमेदवारांना (MKCL) एमकेसीएलच्या जागतिक अद्यावत अभ्यासक्रमांसह मोफत कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्सचे प्रशिक्षण श्री इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन शाहूनगर माजलगाव या संस्थेमध्ये दिले जाणार आहे. यामध्ये रोजगारक्षम चार अभ्यासक्रम असणार आहेत. अभ्यासक्रमांमधून रोजगार निर्मितीचे मोठे ध्येय ठेवून राज्यभर एमकेसीएल (MKCL) व सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहेत. यासाठी महाराष्ट्रातील रहिवाशी मराठा व कुणबी उमेदवारांनी माजलगाव येथील संस्थेस  भेट देऊन अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे संचालक प्रविण शेजूळ यांनी केले आहे.

माजलगाव परिसरातील मराठा आणि कुणबी-मराठा यांनी योजनेत सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या  जाणार आहेत. प्रवेश मर्यादित असून त्यासाठी कालावधी ही मर्यादित आहे. तरी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) आणि  मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था  श्री इन्फोटेकच्या वतीने प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यामध्ये रोजगाराच्या शोधात असणारे तसेच प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक महिला-पुरुष (वय १८ ते ४५ ना वर्ष), युवक-युवतींना कॉलेज करताना पण  प्रशिक्षण आणि नोकरी करण्याची संधी तर मिळणार असून सोबत मुलाखत तंत्र, या व्यक्तिमत्त्व विकास याची ही प्रशिक्षणात तयारी करून घेतली जाणार आहे.

सारथी आणि एमकेसीएलद्वारे राबवण्यात आलेल्या उपक्रमांचा खूप फायदा होत आहे. यामधील अभ्यासक्रम हा खूप उत्तम प्रकारे तयार करण्यात आला आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच याचा संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्हाला फायदा झाला.

दिव्या तोर (प्रशिक्षणार्थी सारथी योजना)

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र

* किमान दहावी पास गुणपत्रक / प्रमाणपत्र.

उत्पन्नाचा दाखला मागील ३ वर्षचा (३१ मार्च २०२५ पर्यंत वैध/नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

* तहसीलदार यांचे (महाराष्ट्र राज्य रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र

Domicile Certificate)

* आधारकार्ड व फोटो

मराठा व कुणबी मराठा युवक-युवतींना सारथी आणि एमकेसीएल (MKCL) च्या ERA माध्यमातून दिलेले जाणारे प्रशिक्षण अद्ययावत आणि रोजगारासाठी मोठी संधी असून महिला, युवक-युवतींनी सहभाग घ्यावा. श्री इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन शाहूनगर माजलगाव संपर्क : ९६०७०७१०६५ , ८६२३९१९५९७ 

 

 

Leave a Reply