Maratha Reservation: सरसकट आरक्षणासाठी विखेंचा शब्द! उद्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक

अन्यथा १ नोव्हेंबर पासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होईल: जरांगे यांचा इशारा 

मुंबईः आज मराठा आरक्षण प्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदीनुसार उद्यापासून प्रमाणपत्र वाटपाचा पहिला टप्पा सुरु करत असल्याची घोषणा केली होती.यावर बोलतान,”द्यायचं असेल तर सरसकट मराठा आरक्षण द्यावं, केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नाही.” अशी भूमिका जरांगेंनी जाहीर केली आहे.जरांगे यांच्या उपोषणाचा आज (सोमवार) चा सहावा दिवस आहे.

सरकारची भूमिकेबाबत तसेच राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात सोमवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काही वेळापूर्वी मला राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावतो. परंतु मी म्हटलं सरसकट द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचं सांगितलं.जरांगे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या एका भावाला न्याय आणि दुसऱ्या भावावर अन्याय; हे जमणार नाही. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर १ नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होईल. तेव्हा हे आंदोलन सरकारला झेपणार नाही.आणि पेलवणार हि नाही .

माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सोळंके काहीतरी बोलले, त्यानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला. आमच्या आंदोलनाला कुणीतरी गालबोट लावत आहे. पोलिसांनी मराठा समाजाच्या पोरांना त्रास दिला तर मला पुढे यावे लागेल. असे हि ते म्हणाले.

Leave a Reply