Maratha Reservation : गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारांचा राजीनामा; काय लिहिलंय पत्रात?

मुंबईः बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन तापले आहे. मराठा समाजातील तरुण बांधव लोकप्रतिनिधींना फोन करून राजीनामा देण्याबाबत विचारणा करू लागले आहेत.

आज (सोमवार)  सकाळी  माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी मोठा हल्ला केला. सुरुवातीला घरावर तुफान दगडफेक करीत त्यांची गाडी जाळली आणि घरालादेखील आग लावली. प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल अवमानकारक टिपणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आंदोलक संतप्त झाले होते.

दरम्यान, बीडच्याच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांना त्यांनी राजीनामा पत्र लिहिले आहे.

काय लिहिलंय राजीनामा पत्रात?

आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनाम्यामध्ये म्हटलंय की, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

असा मजकूर लिहित आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला. आणखी किती आमदार आणि खासदार राजीनामा देतात, हे येत्या काळात दिसून येईल.

Leave a Reply