Maratha Reservation : मराठा आरक्षणाला पोरखेळ संबोधनाऱ्या अजित पवार गटाच्या आमदाराचा बंगला, गाडी जाळली!

बीड: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिपण्णी करणे तसेच मराठा आरक्षण आंदोलनास पोरखेळ असे संबोधने राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवलेआहे. हजारो नागरिकांचा मॉब त्यांच्या बंगल्यात घुसला असून दगडफेक, वाहनांची जाळपोळ, बंगल्याची तोडफोड करुन बंगल्यास आग लावन्यात आली आहे.आहे. सोमवारी (ता. ३०) ही घटना घडली.

मराठा समाजाला आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केले असले तरी गत दोन दिवसांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बसची जाळपोळ, अचानक रास्ता रोको, असे प्रकार होत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हिनवणी करणाऱ्या वक्तव्याची कथीत ऑडीओ क्लीप समोर आली. यावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाले.

आज सोवमारी माजलगाव येथे लॉकडाऊन चे आवाहन केले होते.त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारोंची गर्दी जमली. सुरुवातीला बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यात बंगल्याच्या सगळ्या काचा फुटल्या. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये घुसून चारचाकी वाहनांना आग लावली. आगीनंतर बंगल्यातून ज्वाला आणि धुरांचे लोट बाहेर निघत होते. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्नीशमन वाहनाचीही आंदोलकांनी तोडफोड केली.सध्या शहरात तणाव वाढला आहे.

Leave a Reply