भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आ.सोळंकेचे पी.ए. महादेव सोळंके,सुशील सोळंके यांना जामीन

भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आ.सोळंकेचे पी.ए. महादेव सोळंके,सुशील सोळंके यांना जामीन

माजलगाव, दि.२७: येथील व्यापारी तथा भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांचे पी. ए. महादेव सोळंके यांचा जामीन अर्ज आज (बुधवारी) माजलगाव न्यायालयाने मंजुर केला आहे. तसेच या हल्ल्या प्रकरणी गुत्तेदार सुशील सोळंके यांचा अटकपूर्व जामीन ही न्यायालयाने मंजुर केला आहे.

 

माजलगाव शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर दि.७ मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात शेजुळ यांनी हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून झाला असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आ.प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जनाविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. तपासात आमदार प्रकाश सोळंके यांचे पी.ए.महादेव सोळंके यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. महादेव सोळंके यांचा जामीन अर्ज माजलगाव न्यायालयात दाखल केला होता. त्यावर आज (दि.१२) बुधवारी सुनावणी होऊन न्यायदंडाधिकारी बी.जी.धर्माधिकारी यांनी त्यांची जामीन मंजूर केला आहे. तसेच याच प्रकरणी माजी पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांना साक्ष कामी पोलीसांनी बोलावले होते, त्यात त्यांना महादेव सोळंके यांच्या प्रमाणे अटक होण्याची शक्यता वाटली. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीन न्यायालयात मांडला. त्यावर ही सुनावणी होऊन सुशील सोळंके यांचा जामीन मंजूर करण्यात आला.न्यायालयात सुशील सोळंके यांच्या वतीने ॲड.बी.आर.डक तर महादेव सोळंके यांची बाजू ॲड. एस.एस. सोळंके यांनी मांडली.

Leave a Reply