माजलगाव महावितरण शेतकऱ्याचा बळी घेणार का ? 

m

माजलगाव, दी.१६ (प्रतिनिधी) :माजलगाव महावितरण कडून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन जोडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अनेक वेळा अर्ज ,विनंती करूनही वीज कनेक्शन जोडून देण्यात येत नसल्याने महावितरण शेतकऱ्यांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अतिवृष्टीने अगोदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा मध्ये पैसे भरल्याशिवाय महावितरण कडून शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन तसेच डीपी दिली जात नाही. या उलट त्यांचे वीज कनेक्शन कट केले जाते. निसर्ग कोपला असताना महावितरण कडूनही शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. एकीकडे बळीराजाला अंधारात लोटायचे मात्र दुसरीकडे महावितरणच्या संपत्तीत मात्र वाढ होत आहे. लाईट कनेक्शनची तक्रार झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत वीज कनेक्शन जोडून न दिल्यास  ग्राहकाला महावितरण ने पैसे द्यावे असा 2003 चा शासन निर्णय आहे. सध्या शेतकऱ्याने शेतामध्ये उसाची लागवड केली असताना महावितरण कडून लाईट कनेक्शन तोडण्यात येत आहेत परिणामी गंभीर संकटाला तोंड द्यावे लागत आहे.यातून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. बोगस रीडिंग नोंदवून ग्राहकांकडून दाम दुप्पट विजेच्या बिलाची आकारणी होत असल्याचे प्रकार जिल्ह्यात तसेच माजलगाव तालुक्यामध्ये होत आहेत. यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे नागरिकांची पिळवणूक करत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना बोगस बिले पाठवले जात आहे. बंद असलेल्या घरात विजेचा वापर नसतानाही अशा वीज ग्राहकांना तब्बल पाच ते दहा हजार रुपयांचे बिल पाठवण्यात येत आहे. ग्राहकाच्या मीटरचे रीडिंग न घेता बोगस बिल आकारण्यात येत आहे काही जणांनी वीज बिलाचा पूर्ण भरणा करू नये त्यांनाही बोगस बिले पाठविले जात आहे या भागातील काही ठिकाणच्या फ्युज पेट्या उघड्या असून त्या गंजल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे पुरता नागावला गेलेला शेतकरी आता महावितरण च्या चुकीचा आर्थिक कारभाराचा फटका सहन करत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरण चे कर्मचारी वेठीस धरत आहेत.

माजलगाव तालुक्यातील शेतकरी रामभाऊ गडदे यांनी महावितरण कडे 5 जानेवारी 2022 रोजी त्यांनी नवीन विद्युत कनेक्शन साठी अर्ज केला होता तो मंजूर देखील झाला त्यांचे इन्स्ट्रुमेंट तयार झालेले असताना त्यांनी महावितरण कंपनीला कॉल केला असता त्यामध्ये तीन पोल तसेच थ्री फेज ची तार ही त्यांच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असताना माजलगाव येथील कर्मचारी त्यांना चाल ढकल करत आहेत आपल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तार नाही तर आपल्याला वायरचे केबल मिळेल आणि कुठलाही पोल मिळणार नाही शेतकरी रामभाऊ गडदे यांची महावितरण कडून फसवणूक होत आहे त्यांनी महावितरण कडे अनेक वेळा निवेदन तसेच लेखी तोंडी तक्रारी ही दिल्या पण त्यांना महावितरण कडून चाल ढकलच करण्यात आली अस्तित्वात अजून काम झालेले नाही सदरील शेतकऱ्याने महावितरण ला माझे लाईट कनेक्शन तात्काळ न जोडून दिल्यास मी आत्महत्या करेल ? असे लेखी निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही संबंधित शेतकऱ्यांकडून असा सवाल विचारण्यात येतो की माझी आत्महत्या झाल्यास महावितरण कंपनी याची जबाबदारी घेणार का ?

निलंबित केलेले संबंधित सहाय्यक अभियंता सुहास मिसाळ यांच्याकडून देखील गडदे यांना अनेक वेळा बोलण्यातून फसवणूक करण्यात आली पण निलंबित केलेले सबंधित सहाय्यक अभियंता सुहास मिसाळ यांनी कुठलेही गडदे यांचे काम केले नाही माझी फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.अगोदरच्या काही दिवसात पावसाने शेतकऱ्यांना झोडपले आता महावितरण शेतकऱ्याचा अंत पाहत आहे तर तेवढी तार ओढता येत नाही महावितरण च्या सध्या असलेले सहाय्यक अभियंता चौधरी यांना गडदे यांनी विचारले असता तर संबंधित अधिकारी सांगत आहेत की तुम्हाला तार देता येणार नाही तर गडदे यांनी त्यांना विचारले का देता येत नाही तर अधिकाऱ्यांकडून सांगता येते मला ते सांगता येणार नाही त्यांच्याकडून नुसते उडवा उडवी चे उत्तर देण्यात येत आहे. महावितरणचा भोंगळा कारभार पाहून चीड येत आहे. महावितरण ची व्यवस्था कधी सुधारणार हे देव जाणो!

Leave a Reply