Milk Rate : दूध दरात पुन्हा वाढ , भारतातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी हटसनचे आरोक्या दूध आणि अमूल ,मदरचे डेअरचे दूध 2 रुपयांनी महागलं
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येत आहेत . यापूर्वी दुधाच्या दरात वाढ झाली होती . त्यानंतर आता पुन्हा भारतातील डेरी प्रॉडक्ट बनवणारी अग्रगण्य कंपनी हट्सन ने तिच्या आरोक्या नावाने असलेल्या दूध ब्रँड आणि अमूल ,मदर दुध डेअरीच्या दरात वाढ झाली आहे आणि अन्य कंपन्याही लवकरच दुधाचे भाव वाढवणार आहेत. लिटरमागे 2 ते 4 रुपयांनी दर वाढले आहेत . त्यामुळे शेतकऱ्याला लिटरमागे 37 -40 रुपये मिळतील असा अंदाज आहे . म्हणजेच 16 ऑगस्टपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत . यासबंधी या डेअरीने कंपन्यांनी अधिकृतपणे सांगितले आहे . त्यामुळे त्याचा फायदा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार . मात्र , सर्वसामान्यांना महागाईचा सामना हा करावा लागणार आहे .