मोहन जगताप माजलगाव विधानसभेच्या

भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा व विधानसभा प्रमुखांची निवड जाहीर केली असून बीड लोकसभा प्रमुखपदी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची तर माजलगाव मतदारसंघाच्या विधानसभा प्रमुख पदी मोहन जगताप यांची निवड केली आहे.
लोकसभा व विधानसभा प्रमुख हे पद खूप महत्वाचे असून मतदारसंघातील भाजपची सर्व जबाबदारी निवड झालेल्या प्रमुखांवर आहे. दरम्यान मोहन जगताप हे स्वतः माजलगाव मतदारसंघातुन इच्छुक असून त्यांचीच विधानसभच्या प्रमुख पदी महाराष्ट्र भाजपने नियुक्ती केल्याने मोहन जगताप यांच्या साठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.इतरही मतदारसंघातील नियुक्त्या केल्या असून परळीतून प्रीतम मुंडे,बीड राजेंद्र मस्के, आष्टी सुरेश धस, गेवराई शामसुंदर पुंड, केज मधून इंगळे यांचा समावेश आहे.

Leave a Reply