दहा हजार रुपये फिक्स डीपॉजीट ठेऊन केले मुलींच्या जन्माचे स्वागत!

भाजप नेते रमेश आडसकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत शेंडगे यांचा उप्रकम 

माजलगांव (प्रतिनिधी):-माजलगांव मतदार संघाचे भाजपाचे नेते तथा भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रमेशराव आडसकर यांच्या वाढदिवसानिमित्तम माजलगांव येथील भाजपा युवा नेते अनंत शेडगे यांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम राबवत रमेश आडसकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.पंकजाताईसाहेब गोपीनाथराव मुंडे व बीड लोकसभेच्या लोकप्रिय खासदार मा.श्री.डॉ. प्रीतमताईसाहेब गोपीनाथराव मुंडे यांच्या ”बेटी बचाओ बेटी पढाओ” या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरवले व जन्मलेल्या मुलींसाठी दहा हजार रुपये मुदत ठेव केले . यामुळे सदरील मुलींचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे युवा नेते अनंत शेंडगे यांनी सांगितले आहे.

माजलगांव मतदार संघातील जनतेच्या मनातील भावी आमदार भाजप नेते जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत प्रयत्नशील असणारे कर्तृत्ववान नेतृत्व रमेशराव आडसकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगांव येथे भाजपा युवा नेते अनंत शेंडगे वतीने सामाजिक बांधिलकी उपक्रम राबविले जात आहे . यावेळी जि.सचिव भाजपा बबन बप्पा सोळंके, तालुकाध्यक्ष अरुण आबा राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ.अशोकराव तिडके, शिवसेना तालुका अध्यक्ष तुकाराम बापू येवले, बाजार समिती माजी उपसभापती निळकंठराव भोसले, माजी उपनगराध्यक्ष दीपकराव मेडके, डॉ.भगवानराव सरवदे, माजी नगरसेवक विनायक रत्नपारखी, ईश्वर खुरपे, बबनराव शिरसाट, दत्ता महाजन, अर्जुन पायघन, बंडू नाना सोळंके, माऊली सरवदे, बाळासाहेब शिरसागर, आनंत जगताप, जयपाल भिसे, धनंजय काळे, दत्ता क्षीरसागर,यांच्या सह कार्यकर्ते व आयोजक भाजपा युवा नेते अनंत शेंडगे उपस्थित होते.

Leave a Reply