इंडियन आयडॉल नंदिनी व अंजली गायकवाड यांचा सहभाग
माजलगाव – येथील रसिक मंडळाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृतीसमारोह निमित्त शनिवार दिनांक १० रोजी सुरेल मैफिल व रविवारी मराठवाडास्तरीय सुगम नाट्यगीत गायन स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन रसिक मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
– माजलगाव रसिक मंडळाच्या वतीने मागील 33 वर्षांपासून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती समारोह साजरा करण्यात येतो. यावर्षी शनिवार दि.१० रोजी इंडियन आयडॉल असलेल्या नंदिनी व अंजली गायकवाड या भगिनींच्या सुरेल मैफिलीचे आयोजन सायंकाळी सात वाजता महात्मा फुले विद्यालयात करण्यात आले आहे. या मैफिलीस साथ संगत संवादिनी अंगद गायकवाड तर तबला रोहन पंढरपूरकर यांचा राहणार आहे.रविवारी सकाळी ११ वाजता मराठवाडास्तरीय सुगम नाट्यगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते व दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की व रसिक मंडळ अध्यक्ष आर डी भिलेगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी विजेत्या स्पर्धकांना पारितोषक वितरण समारंभ कार्यक्रम रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अर्चना पवार यांच्या उपस्थितीत मंगलनाथ मल्टीस्टेटचे कार्यकारी अधिकारी रवींद्र कानडे व सुरेखा कुलकर्णी यांच्याहस्ते होणार असून या सर्व कार्यक्रमास रसिक मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रभाकर साळेगावकर,डॉ नरेंद्र निळेकर, सुरेश भानप यांनी केले आहे.