बहुप्रतिक्षित नगरपालीकेच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला?

 

मुंबई -नेतृत्व विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे की नगरसेवक, पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य अशा पदामधून राज्यातील काही मंडळी राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत. कैलासवासी गोपीनाथ मुंडे,विलासराव देशमुख यासारखे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्था मधूनच राज्य व राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाली होती.यामुळे या निवडणुकाकडे नेतृत्व निर्माण करणाऱ्या निवडणुका म्हणून पाहिले जात असले तरी गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका विविध कारणास्तव लांबल्या गेल्या आहेत.

परंतु येत्या 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या निवडणूकां संदर्भात सुनावणी असून मार्च मध्ये या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे मतं विविध राजकीय जाणकार व खात्रीलायक सूत्र व्यक्त करत आहेत. या अनुषंगाने येत्या 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply