यशवंतराव महाराजांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय – भुषणसिंह होळकर

“नगरच्या नामांतराला कोण आडवतो बघूच”

“ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज हि दुर्लक्षित”

वाफगाव- राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली. राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली असे प्रतिपादन होळकर घराण्याचेे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील वाफगाव तालुका खेड येथे राजराजेश्वर महाराज यशवंतराव होळकर प्रथम यांच्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत.महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता.

या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला भुईकोट सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज हि दुर्लक्षित- उपेक्षित आहे. त्याचे जतन संवर्धन व्हावे या साठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे अशी भावना आहे.” यासाठी होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या नेतृत्त्वात ‘होळकर राजपरिवारा’ तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते .

महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळ्यास किल्ले वाफगाव, तालुका- खेड, येथे पार पडला .या शाही सोहळ्यास राज्यभरातून समाज बांधव, समाजिक संघटनाचे प्रमुख, सामिल झाले होते. धनगर समाजाच्या पारंपरिक वेषात आलेल्या कलाकारांनी धनगर समाजाची पारंपारिक लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच मर्दानी खेळ सादर करण्यात आले. महादेवाचा अभिषेक, तरी भंडारा उचलणे व गावात शोभायात्रा काढून कार्यक्रमास सुरुवात झाली.

 

नगरच्या नामांतराला कोण आडवतो बघूच-भुषणसिंह होळकर

नगर जिल्ह्याचे नामांतर करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास कोण आडवा येतो तेच बघू,खांद्यावरील घोंगडे खाली ठेवले हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी होळकर वंशज भुषणसिंह यांनी नामांतरास विरोध करणाऱ्या विखे पाटलांना दिला. तर या कामासाठी सर्वांनी गट तट बाजूला ठेवले एकसंध होण्याची गरज असून मी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.

किल्ला पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन संवर्धन करावे-आ.गोपिचंद पडळकर

इंग्रजां विरोधात एकही लढाई न हारणारे महाराजाचे जन्मस्थान असलेला हा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा किल्ला दुर्लक्षित आहे.राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन त्याचे जतन संवर्धन व्हावे यासाठी मि पाठपुरावा करीत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस याच्यांशी याबाबतीत बोलणे झाले आहे. लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांचे ढोल वादन…

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी कलाकारांसोबत ढोल वादन करून उपस्थित जनतेची यांची मने जिंकली.

Leave a Reply