मुंबई: प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून निखिल वागळे व हिंदुत्व वादी कार्यकर्त्यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे.राहुल गांधीची भारत जोडो यात्रा त्याला न मिळणारी प्रसिद्धी यात्रेत सावरकरांचा विषय येताच देशभरातील मीडियाने भारत जोडो यात्रेला दिलेली प्रसिद्धी राज्यपाल भगत सिंग कोशियारी यांचे वक्तव्य,सावरकरांचा वाद त्यात हिंदुत्ववादी जैष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन या सर्व प्रकरणात निखिल वागळे यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले यानंतर काल रात्री होय मी जिवंत आहे हा मथळा घेऊन निखिल वागळे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते या लाईव्ह मधे माझे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे समर्थक असतील असे सांगूंन निखिल वागळेंनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान रोज नवीन मुद्दे घेऊन निखिल वागळे राज्य व केंद्र सरकारवर तोफ डागताना दिसून येत असून हिंदुत्ववादी कार्यकर्ते व निखिल वागळेंमधे रोज सोशल मीडियात चांगलीच शाब्दिक चकमक झडत आहे.