माजलगावात पत्रकारांच्या वतिने भिमजन्मोत्सव साजरा

पत्रकार भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन

माजलगांव, प्रतिनिधी :भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार निश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य दिनांक १४ एप्रिल रोजी माजलगांव शहरातील पत्रकार भवन येथे भिमजन्मोत्सव साजरा करण्यात आला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतीबा फुले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार उमेश काका मोगरेकर यांची उपस्थीती लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तुकाराम बापू येवले तर विशेष मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार किशोर मामा प्रधान यांची उपस्थिती लाभली.

या अभिवादन सभेचे आयोजन अमर साळवे , सुभाष बोराडे , राजरतन डोंगरे यांनी केले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी पत्रकार ज्योतीराम पांढरपोटे , हरिष यादव , उमेश जेथलिया , संतोष रासवे , वाजेद पठाण , अरविंद ओव्हाळ , बाळासाहेब आडागळे , रविंद्र राऊत , पृथ्वीराज निर्मळ , दिपक चांदमारे यांचे योगदान लाभले असून किशोर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या अभिवादन सभेस पत्रकार परमेश्वर सोळंके, दिलिप झगडे , महेंद्र मस्के , दत्ता येवले , दर्शन डोंगरे सह डॉ.आंबेडकर प्रेमी पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली .या अभिवादन सभेचे सुत्रसंचालन पत्रकार हरिष यादव यांनी केले तर प्रास्ताविक राजरतन डोंगरे यांनी केले यावेळी पत्रकार सुभाष नाकलगांवकर यांनी शाहिर वामनदादा कर्डक व शाहिर आत्माराम साळवे यांच्या भिमगितांचा जलसा गाजवला . उमेश मोगरेकर , तुकाराम येवले, उमेश जेथलिया , दिलिप झगडे , सुभाष बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अमर साळवे यांच्या संकल्पनेचे स्वागत करत एकमताने संकल्प केला कि या पुढे प्रत्येक महापुरुषांची जयंती पत्रकार भवनात साजरी करण्यात येईल.

#Maha_Jagaran #महा_जागरण #Mahajagaran

Leave a Reply