पंकजा मुंडेंना धक्का: धनंजय मुंडेंनी दुसऱ्यांदा जिंकला ‘गोपीनाथ गड’

बीड, दी.७(महा जागरण टीम): जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बंधू-भगिनीमध्ये प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असणारा वैद्यनाथ साखर कारखाना व स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मृतिस्थळ असणारा गोपीनाथगड ज्या ग्राम पंचायतचे हद्दीत येतो अशी बीड जिल्ह्याच्या राजकाणात महत्वाची मानली जाणारी ‘पांगरी’ गावची ग्रामपंचायत दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचं वारं वाहतं आहे. बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. आज (बुधवार दी.७) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी जिल्ह्याच्या राजकाणात महत्वाची मानली जाणारी ‘पांगरी’ ही ग्रामपंचायत दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेली आहे. पांगरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतीस्थळ गोपीनाथगड आहे.

धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकराव कराड यांच्या प्रयत्नाने पांगरी ग्रामपंचायतीच्या ११ जागा पैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये सरपंच पदी सुशिल वाल्मिकराव कराड यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निकालानंतर जल्लोषात परळीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत सुशिल कराड यांना शुभेच्छा दिल्या. २०१७ सालीही ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून जिंकली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पंकजा मुंडे व त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे ग्राउंड लेवलवरती काम नाही, जनसंपर्क कमी आहे अशी चर्चा मतदारसंघा बरोबरच जिल्ह्यात होत असते.त्यामूळे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मी आता परळी मतदारसंघात पूर्ण लक्ष देणार असल्याचे सांगितले होते.

Leave a Reply