पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् भाविकांचा प्रवास सुखकर!

प्रतीकात्मक फोटो

आळंदी,दी.२३(प्रतिनिधी): श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त दर्शन घेऊन परत माजलगावला जात असताना आळंदी माजलगाव बस अर्ध्या रस्त्यातच नादुरुस्त झाली. ही बाब माजी मंत्री पंकजाताई यांच्या कानी जाताच त्यांनी एका फोनवर भाविकांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करत भाविकांचा प्रवास सुखकर केला.

त्याचे असे झाले की माजलगाव तालुक्यातील भाविक कार्तिक वारी निमीत्त आळंदीत आले होते.आळंदीहून माजलगावला येत असताना अचानक मध्येच बस खराब झाली. त्यामुळे बस मध्ये बसलेल्या काही व्यक्तींनी भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राउत यांना फोन करून माहिती दिली की आता दुसरी गाडी नाही ऊपलब्ध नाही. इथे राहण्याची व खाण्याची पण सोय होणार नाही त्यामुळे आम्हाला काहीतरी यातून मार्ग काढावा अशी विनंती केली. अरुण राऊत यांनी पंकजाताई मुंडे यांना ही अडचण सांगितली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकनेत्या पंकजाताई यांनी एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला व अधिकाऱ्यांनी देखील लगेच तात्काळ दुसरी बस पाठवून सहकार्य केले.या गाडी मध्ये माजलगाव व आसपासच्या ग्रामीण भागातील ५३ भाविक होते. पंकजाताई मुंडे यांनी फोन केल्यामुळे आमची समस्या दूर झाली. त्यांनी लगेच दुसरी गाडीची व्यवस्था करून भाविकांची अडचण होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे बस मधील सर्व भाविक अतिशय आनंदी झाले व ताईंचे आभार व्यक्त केले. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रमाणे पंकजा मुंडे देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Leave a Reply