मरणाशी झुंज देत असलेल्या विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहण्याची चढाओढ!

पुणे, दी.२४(प्रतिनिधी):  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी चुकीची असल्याचं त्यांची पत्नी वृषाली यांनी म्हटलं आहे. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत असं वृषाली यांनी सांगितलं आहे.

“काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर सकाळी निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी माहिती दिली.

विक्रम गोखले यांच्याविषयी रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेले प्रसिध्दी पत्रक:

विक्रम गोखले व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ते कोमामध्ये असल्याची आणि उपचारांना प्रतिसाद देत नसल्याची बातमी पूर्णपणे खोटी.”

Leave a Reply