गंगाखेड मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर सीबीआयने 635 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केल्याने रत्नाकर गुट्टेंवर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने नुकतीच गुट्टे व इतर आरोपींच्या 3 ठिकाणी छापेमारी करून शोध मोहीम राबवली होती त्यानंतर आता गुट्टे यांच्यासह त्यांच्या मुलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर भांदवी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हेगारी कट रचून फसवणूक केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ईडीने 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्याविरुद्ध कथित मनी लॉन्ड्री प्रकरणी गुन्हा दाखल केला होता ईडीने या प्रकरणात 255 कोटींची मालमत्ता ही जप्त केली होती दरम्यान आता सीबीआयनेही गुन्हा दाखल केल्याने आमदार रत्नाकर गुट्टेंवर अटकेची टांगती असल्याचे दिसत आहे.यापूर्वीही रत्नाकर गुट्टे यांना आर्थिक अपहार प्रकरणात अटक झाली होती.