बुलढाणा प्रतिनिधी.
समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बसमधील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते या अपघात प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे बुलढाणा बस अपघात प्रकरणी वाहन चालक दानिश शेख इस्माईल शेखला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून अपघात टायर फुटून झाला नसून बस रोड दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकाला गाडी घासली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली यावेळी डिझेल टॅंक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आरटीओने दिला आहे
समृद्धी महामार्गावर मोठ्या वाहनांनी तिसऱ्या लेन मधून जाणं अपेक्षित असतानाही बस दुभाजकावर आढळली याचा अर्थ चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्याचं स्पष्ट होत असल्याचे मत नागपूर ग्रामीण आरटीओचे निरीक्षक राहुल धकाते यांनी नोंदवले सोबतच वाहकांची ब्रेथ एनालायझर तपासणी करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान या सर्व प्रकरणावरून बस चालक संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात काही घातपाताची शक्यता आहे का? याची चौकशी पोलीस करत आहेत.