छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत-विनायक रत्नपारखी
माजलगाव : सक्सेस पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विनायक रत्नपारखी अध्यक्ष म्हणून निखिल वाघमारे सर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वाती वाघमारे मॅडम यांनी केले.
यावेळी नगरसेवक विनायक रत्नपारखी बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे कायम सर्वांसाठी प्रेरणा व ऊर्जा स्त्रोत आहेत व राहतील , छत्रपती शिवाजी महाराज हे खरे स्वराज्य रक्षक होते कारण जनतेला आपले वाटेल असे राज्य त्यांनी निर्माण केले होते . शिवजयंतीच्या दिवशी गाडीला भगवे झेंडे लावून गावभर फिरून व मोबाईलवर फक्त स्टेटस ठेवून चालणार नाही तर त्यांची विचार अमलात आणणे हे गरजेचे आहे . आपली शाळा ही त्यांचे विचार हे सर्वत्र पोहोचण्यासाठी अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ,व्याख्यानातून, वक्तृत्व स्पर्धेतून , शिवचरित्राच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांचे विचार पोहोचण्याचे काम करत आहे व खरा इतिहास जनतेसमोर मांडत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून अभिनंदन व कौतुक करतो व आपण सर्वजण आज एक निश्चय करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आपल्या जीवनात आचरणात अमलात आणू भ्रष्ट आचरण रहित जीवन जगू , चारित्र्यसंपन्न ,निर्व्यसनी, प्रामाणिकपणे ,एक आदर्श व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न करू व हीच त्यांना आज त्यांच्या जयंती निमित्त खरी आदारांजली ठरेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल वाघमारे यांनीही आपले विचार मांडले व विद्यार्थ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत सर्व वातावरण गजबजुन टाकले होते या कार्यक्रमाप्रसंगी विविध विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व मा जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती व अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपले विचार मांडले व आपले कलागुण या ठिकाणी दाखवून मंत्रमुग्ध केले, यावेळी आपल्या विद्यार्थ्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक पालक सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी कर्मचारी वृंद उपस्थित होते.