राजीनाम्या नंतर शरद पवार पुन्हा पावसात भिजले!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले! होय, हे खरे आहे! पण, हा पाऊस नेहमीचा नव्हता… हा पाऊस होता सोशल मीडियावरील मीम्सचा!

 

त्याचे झाले असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच एके दिवशी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा आपण राजीनामा देत राजकीय निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अवघ्या साडेतीन दिवसातच त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. शरद पवार यांनी राजीनामा आणि राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यापासूनच त्यांच्यावर सोशल मीडियात विविध मिम्स तयार करून शेअर केले जात होते. सुशील मीडियावरील अनेकांना शरद पवारांचा हा केवळ राजकीय स्टंट वाटत होता. काहींनी तर शरद पवार नेहमीप्रमाणे पलटी मारतील, यू टर्न (U Tern) घेतील,असा ठाम विश्वास जाहीर केला होता.आणि पुढे घडलेही तसेच… त्यामुळे सोशल मीडिया वीरांना ही भलतेच स्फुरण चढले.

NCP पक्षाला राष्ट्रीय दर्जाचा राहिला नाही मग शरद पवार अस्तित्वात नसलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा कस काय देऊ शकतात?,

‘साडेतीन जिल्ह्यात विस्तार असलेल्या पक्षाचे अध्यक्षाने राजीनामा सुद्धा साडे तीन दिवसातच मागे घेतला’…

‘भाकरी फिरवण्याऐवजी साहेबांनी स्वतः भाकरी खाऊन टाकली आहे!’

 

अशा मार्मिक भाषेत मीन्स तयार करून सोशल मीडिया वीरांनी पवार साहेबांना अक्षरशः मिम्सच्या पावसात भिजवले. यापूर्वी 2019 मधील निवडणुकांच्या वेळी पक्षाची अवस्था बिकट झालेली दिसत असताना शरद पवारांनी सातारला भर पावसात सभा घेतली. आणि या सभेमुळे त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण होऊन त्याचे रूपांतर मतांमध्ये झाले व राष्ट्रवादी पक्ष तरला होता.

महा जागरण न्यूज पोर्टल, Maha Jgaran, बातमी नव्हे तथ्य

Leave a Reply