आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक

माजलगाव

 

प्रकाश सोळंकेच्या घरावर मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली असून या दगडफेकीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या काही गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक बातमी मिळाली आहे. आज सकाळपासूनच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माजलगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते मराठा क्रांती मोर्चाच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी स्वतःची व्यवहार बंद ठेवले परंतु आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर मात्र राडा झाला मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार महोदयांच्या घरावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीदरम्यान या दगडफेकी दरम्यान आमदार प्रकाश सोळंकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने जो बंद करण्यात आला होता त्या बंदला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांनी अन्न पाणी घेणेही टाळल्याने त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीनंतर माजलगावमधे  तणाव निर्माण झाला आहे.

Leave a Reply