मुंबई: राज्यात लवकरच तलाठी भरती व मंडळ अधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
‘जे नसे ललाटी ते करी तलाठी’ असा एक वाक् प्रचार मराठी भाषेत आहे. यावरून आपल्याला तलाठी या पदाचे महसूल खात्यातील महत्त्व सहज लक्षात येईल. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीशी निगडित सर्व उतारे, अभिलेखे, नोंदी ठेवण्याचे काम तलाठी यांना करावे लागते. तलाठी हे पद महसूल खात्यातील सर्वात निम्नस्तरावरील पद असले तरी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना लागणारे उतारे जसे की सातबारा, आठ अ, फेरफार नक्कल आदी उतारे देण्याचं काम त्यांना करावे लागते. त्याबरोबरच अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान याच्या नोंद घेणे व अहवाल शासनाला पाठवणे ही कामे ही तलाठी करतात. आठ ते दहा गावांच्या शेती क्षेत्रासाठी एक तलाठी सज्जा कार्यालय निर्माण केलेले असते. हेच तलाठी यांचे मुख्यालय; त्यांना मुख्यालयी थांबणे बंधनकारक असते. तलाठी यांचा वरिष्ठ अधिकारी म्हणजे मंडळ अधिकारी होय. मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व कोतवाल काम करत असतात. अशा या अत्यंत महत्त्वाचे पद आसलेल्या
तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.