Flying Bike: दुचाकीवरून घ्या हवेत भरारी! आली आहे उडणारी बाईक…

Flying Bike: दुचाकीवरून घ्या हवेत भरारी! आली आहे उडणारी बाईक…

मुंबई : वाचून खोटे वाटले ना? पण हे खरे आहे! तंत्रज्ञान सध्या खूप पुढ गेलं आहे. पेट्रोलचे दर वाढल्यानंतर त्याला पर्याय म्हणून ई-बाईक (E-bike) बाजारात आल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा एक नवीन आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.

 

अनेक प्रयत्न करुनही रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळेच आता याला पर्याय म्हणून हवेत उडणाऱ्या गाड्या आल्या आहेत. आता या बाईक्स रस्त्यावर नाही तर चक्क आकाशात उडताना दिसणार आहेत.

अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅॅकने (Aviation Company Jetpack) हवेत उडणाऱ्या बाईकचं बुकींग सुरु केलं आहे. हवेत उडणारी ही बाईक 250mph वेगाने उडण्यास सक्षम आहे. 2 ते 3 वर्षात ही बाईक बाजारात येण्याची शक्यता आहे.

 

मुंबईचं ट्रॅफीक सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे तुम्ही जर मुंबईहून लोणावळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बाईक एक चांगला पर्याय आहे. 83 किलोमीटर लांब असलेल्या लोणावळ्याला तुम्ही या बाईकने 30 मिनिटात पोहचू शकता.बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किलोमीटरचा प्रवास करण्याची क्षमता आहे. या बाईकमध्ये चारही कोपऱ्यांवर दोन जेट इंजिन वापरला जाणार आहेत. या बाईकमध्ये व्हिडीओ गेमसारखी (Video game) कंट्रोल सिस्टीम असणार आहे.ही बाईक तुम्हाला सायकल चालवण्याचा आनंद तर देईलच, शिवाय ती बघायलाही मिळेल. ही बाईक हवेत उडण्यासाठी लढाऊ विमानांमध्ये फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित केले जाते. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे आणि दुसरे बटण उंचीवर नेऊन स्पीड देण्यासाठी देन्यात आले आहे.

बाईक निर्माता जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत ३.१५ कोटी रुपये ठेवली आहे. ही बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते.

Leave a Reply