नेकनूर
नेकनूर येथे काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील महिला कीर्तनासाठी जातं असताना तिला वं तिच्या बाळाला मारहाण झाली.घटनेच्या निषेधार्थ आज हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी पुण्याहून आमदार महेश लांडगे वं अहिल्या नगर मधून आमदार संग्राम जगताप आले असताना जिल्ह्यातील नेते मंडळींनी या मोर्चा पासून अंतर राखल्याने चर्चेला उधान आले आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यां पासून लव्ह जेहादच्या घटनांनी ढवळून निघाला. माजलगावात कॅफेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. अंबाजोगाई मधेही लव्ह जेहादची घटना घडली. नेकनूर येथे तर जेहादी टोळक्यांनी मराठा समाजातील एका महिलेला व तिच्या बाळाला मारहान केली. जिल्ह्यात गंभीर घटना घडतं असताना जिल्ह्यातील पुढारी या सगळ्यांपासून नामानिराळे राहिल्याचे दिसले. एकाही ठिकाणी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भेट देऊन पीडित महिलांचे सांत्वन केले नाही. काल नेकनूर येथे हिंदू आक्रोश मोर्चा निघाला परंतु हिंदूंच्या मतांवर आमदार खासदार झालेले जिल्ह्यातील स्थानिक पुढारी त्या ठिकाणी आले नाहीत.खासदार, मंत्री. घटना घडलेल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती खटकतं होती.
एरवी साध्या साध्या कार्यक्रमांना न चुकता जाणारे राजकारणी त्यांच्याच मतदारसंघातील लव्ह जेहादच्या पीडितांची साधी भेटही घेणार नसतील तर यांना मतदान तरी का करावे? असा प्रश्न जिल्ह्यातील हिंदू करतं आहेत.पुण्याहून आमदार महेश लांडगे येतात अहिल्या नगरवरून संग्राम जगताप येतात परंतु हिंदूंच्या मतावर आमदार खासदार असलेले बीड जिल्ह्यातील पुढारी लव्ह जेहाद, गोहत्या सारख्या गंभीर प्रकारातही शांत कसे राहू शकतात?हा प्रश्न जिल्ह्यातील हिंदूं समोर पडला असून हिंदू समाजात स्थानिक पुढाऱ्यांविषयी प्रचंड रोष आहे.