धारूर, वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्या

रमेश आडसकर यांची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी 

माजलगाव,दी.२४(प्रतिनिधी):सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीने जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांचे पाच लाख 86 हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे यात माजलगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 410 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाकडे वर्ग केला आहे प्रशासनाने यात माजलगाव मतदार संघातील धारूर व वडवणी तालुका वगळला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या दोन्ही तालुक्यांचा मदतीस समावेश करावा अशी मागणी रमेशराव आडसकर यांनी केली आहे.

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले शासनाकडून उपलब्ध झालेला नुकसान भरपाईचा निधी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटपासाठी तालुक्यांना वर्ग केला आहे मात्र यामध्ये माजलगाव मतदार संघातील धारूर व वडवणी तालुका वगळला आहे या दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे माजलगाव मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर यांनी केली आडसकर यांनी बुधवारी दिनांक 23 मुंबईत राज्याचे सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी माजलगाव बाजार समितीचे माजी उपसभापती निळकंठ भोसले समवेत होते. धारूर व वडवणी या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपण जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश देऊन एकही पात्र शेतकरी वगळला जाणार नाही याची काळजी घेऊ असे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

Leave a Reply