नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या केरला स्टोरी या चित्रपटाने चांगली सुरवात केली असून मुंबई सह उत्तर भारतात या चित्रपटाला पसंती मिळत आहे.केरळ राज्यात घडलेल्या सत्यकथानकावर हा चित्रपट असून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.इसिस च्या आतंकवादी कारवाईने संपूर्ण जग चिंताग्रस्त असताना भारतातून हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना इसिसच्या आतंकवाद्यांसाठी सेक्स स्लेव बनून पाठवण्यात आले होते या तरुणी लव्ह जेहादला बळी पडल्या होत्या या चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होत असून हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ला,सांगली जिल्हाध्यक्ष अपर्णा गोसावी,प्रदेश सदस्य माणिकताई जोशी,मिरज शहराध्यक्ष निलेश साठवे,यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.